तडीपार गुंडास अटक

    24-Jul-2024
Total Views |
 
criminal arrested
 
नागपूर :
विना परवानगी शहरात दाखल झालेल्या एका तडीपार गुंडास गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली. असलम कलाम शेख (35) रा. रामनगर, तेलंगखेडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 
असलम विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. 12 जानेवारी 2024 रोजी झोन 2 चे डीसीपी राहुल मदने यांनी त्याला शहर आणि ग्रामीण भागातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. सोमवारी सायंकाळी असलम कुटुंबीयांना भेटण्यासाठी हजारी पहाड येथे आला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी असलमच्या वडिलांचे घर गाठून त्याला बेड्या ठोकल्या.