आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत

    24-Jul-2024
Total Views |
Financial Assistance in Case of Death on Duty
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ड्युटीवर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार त्याला १० लाख रुपयांची मदत करेल, तर अपंगत्व आल्यास त्याला ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. या निर्णयामुळे स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना दिलासा मिळाला आहे.
 
ड्युटीवर असताना एखाद्या आशा स्वयंसेविकेचा अपघाती मृत्यू झाल्यास राज्य सरकार आता 10 लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच कर्तव्यावर असताना अपघात होऊन कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. तसेच ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ योजना सुरूच राहणार असून ही रक्कम थेट मेंढपाळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 
आज कोणते निर्णय घेतले?
 
- 'राजे यशवंतराव होळकर महामेश' योजना सुरूच राहणार आहे. मेंढपाळ लाभार्थ्यांना आता थेट त्यांच्या खात्यात रक्कम मिळणार आहे.
- आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गटप्रवर्तकांना अनुदान देण्याचा निर्णय. अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाईल.
- कृषी पिकांचे नुकसान निश्चित करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा विकसित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
- दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण धोरण लागू करण्याचा निर्णय.
- बृहन्मुंबईत न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाड्याने देण्याचा निर्णय.
- अंबड तालुक्यातील एमआयडीसीसाठी 16 हेक्टर सरकारी जमीन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.