'लाडकी बहीण योजने'त आणखी सहा नवीन बदल; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

    24-Jul-2024
Total Views |
Ladki Bahin Yojana
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
'मुख्यमंत्री 'लाडकी बहीण योजने' (Ladki Bahin Yojana) अंतर्गत सहा नवीन बदल करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे.
 
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झालेला असेल आणि तिने महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनेक नवीन नियम लागू केले जाणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेसाठी घेतलेले नवीन नियम-
 
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
- एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.
- केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
- नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
- ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.