नेहरू महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

    24-Jul-2024
Total Views |
 
Nehru College
 
वाडी :
येथील जवाहरलाल नेहरू कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात एनसीसी, एनएसएस व नेचर ग्रीन क्लब तसेच विद्यार्थी कल्याण परिषदेअंतर्गत रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम जनजागृती अभियानाचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी एमआयडीसी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे, सहायक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ, डॉ. सारंग खडसे, डॉ. कल्पना बोरकर, डॉ. मानमोडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन डेहनकर, प्रा. अमित गायधने, नेचर ग्रीन क्लब समन्वय डॉ. अविनाश इंगोले उपस्थित होते.
 
शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहे. तेव्हा दंडच भरावा लागेल असे गृहीत धरून वाहन चालवू नका तर आपल्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे विजय धुमाळ यांनी केले.
 
स्टंटबाजी करू नका ते घातक आहे तसेच हेल्मेटचा वापर करा, सीट बेल्ट लावा असे मार्गदर्शन प्रशांत पांडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. पंकज पाटील,संचालन डॉ. सारंग खडसे यांनी तर आभार डॉ. काशीनाथ मानमोडे यांनी मानले. यावेळी डॉ. अर्चना देशमुख, डॉ. मनीषा भातकुलकर, डॉ. सुभाष शेंबेकर, प्रा.शुभम शहारे, प्रा.धनराज राठोड, प्रा.सुनील अखंडे व महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.