नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर मोठी दुर्घटना; टेक ऑफ घेताच विमान कोसळले

    24-Jul-2024
Total Views |

Plane crashes at Tribhuvan International Airport


एबी न्यूज नेटवर्क :
नेपाळच्या काठमांडूमधून मोठ्या दुर्घटनेची माहिती पुढे येत आहे, काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरून विमानाने टेक ऑफ घेताच विमान कोसळले, विमान कोसळताच विमानाने पेट घेतला. वृत्तवाहिनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण १९ जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कोसळलेले विमान हे सूर्या एअरलाइन्सचे आहे. हे विमान काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखराला जात होते. विमानात विमान कंपन्यांचे तांत्रिक कर्मचारी बसून असल्याची माहिती मिळत आहे. विमान कोसळताच त्याचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले आणि आकाशात अचानक धुराचे लोट दिसू लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून, विमानात १९ जण असल्याची माहिती आहे. आता सेनाद्वारे मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. विमानातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन विभागाच्या पथकाकडून पाण्याचा मारा करण्यात येत आहे.
 
 
 
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार, सूर्या एअरलाइन्सचे CRJ7 (Reg-9NAME) काठमांडू येथून स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:११ वाजता पोखरा येथे उड्डाण करत असताना उजवीकडे वळले आणि धावपट्टीच्या पूर्वेकडील ठिकाणी अपघात झाला. आग आटोक्यात आणण्यात आली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. या अपघातात १८ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका जखमी व्यक्तीला वाचवून रुग्णालयात नेण्यात आले आहे.