राकाँपा (श.प.) नागपूर शहरतर्फे महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पनेच्या विरोधात निषेध आंदोलन

    24-Jul-2024
Total Views |
 
NCP SP Nagpur protest
 
नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नागपूर आज बुधवार २४ जुलै २४ रोजी व्हेरायटी चौक गांधी पुतळा येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व शहर अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पनेच्या विरोधात निर्मल सीतारामन यांनी महाराष्ट्रामधील नागरिकांवर अन्याय केल्याबद्दल बीजेपी सरकारचे व केंद्र सरकारच्या विरोधात नारे निदर्शने करून निषेध आंदोलन करण्यात आले.
 
यावेळी शहराध्यक्ष दुणेश्वर पेठे यांनी सांगितले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांची घोषणा केली. एखाद्या राज्याला विशेष मदत करायची आणि इतर राज्यांकडे बघायचं सुद्धा नाही. हा चुकीचा पायंडा मोदी सरकार पाडत आहेत. आज केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे.
 
आंदोलनात प्रवीण कुंटे पाटील, शेखर सावरबांधे, जानबाजी मस्के, अविनाश गोतमारे, श्रीकांत घोगरे, रेखा कूपाले, राजा बेग, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, राजू सिंग चव्हाण, प्रशांत बनकर, तनुज चौबे, अनिल बोकडे, रिजवान अन्सारी, वसीम लाला, सुरेश वसु, शेखर पाटिल, रुपेश बांगडे, सुनील लांजेवार, पिंक्की शर्मा, हेमंत भोतमांगे, धनंजय देशमुख, कादिर शेख, बिंदू मडावी, शशी भोंगाडे, बबीता सोमकुवर, सुकेशनी नारनवरे, चंद्रकांता जयस्वाल विनोद कावळे, विनय मुदलियार, नंदू माटे, पवन गावंडे, रुद्र धाकडे, अमित जेठे, नसीम सिद्दिकी, जाकीर शेख, भीसीकर भाऊ, नथुलाल दारोटे, संजय आग्रे, दिनेश साळवे, गौरव साळवे, कमलेश बांगडे, मासुरकर प्रवेश मेश्राम, मोहन खानचंदानी, गोपी आंबोरे, बलराम आळे, शेयलु शाहु, मेहबुब रंगरेज, बब्बलु डेहेरीया, दया पराते, रवी ठाकुर, सुनिल दिवटेलवार, दुर्गेश ठाकुर, अतुल जुनघरे, महेश वाधवणे, प्रशांत मसराम शंकर जैसवाल आकाश चिमणकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.