वाठोडा येथे अज्ञात आरोपीकडून इसमाची हत्या

    24-Jul-2024
Total Views |

Murder by unknown accused in Wathoda
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रजापती नगरमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मनोज बंगाली बंजारे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो कचरा वेचाण्याचे काम करायचा.
 
माहितीनुसार, एका अज्ञात आरोपीने मनोजच्या डोक्यात मारून त्याला ठार केले. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच मनोजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.