केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी विरोधी: माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

    24-Jul-2024
Total Views |
 
MLA Rana Dilip Kumar Sananda
 
खामगाव :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात केंद्र सरकारने टीडीपी व जेडीयु या दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यासाठी तब्बल 42 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 
आजचे केंद्रीय बजेट देशासाठी होत की केवळ बिहार व आंध्रप्रदेशसाठी हे समजेनासे झाले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे 16 हजार कोटी रुपये अनेक महिन्यांपासून थकवुन ठेवले आहे व महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा उचलुन आंध्रप्रदेश व बिहारला दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणतीही विशेष तरतुद केली नाही.
 
कापूस, संत्रा, धान, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असून या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यावर अन्याय झाला आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली आहे.