बाल नाट्य व राज्‍य नाट्य स्‍पर्धेतील विजेत्‍यांचा सन्‍मान

    24-Jul-2024
Total Views |
- 62 वा महाराष्‍ट्र राज्‍य नाट्य महोत्‍सवाचे पार‍ितोषिक वितरण थाटात संपन्‍न

childrens drama and state drama competition winners 
 
नागपूर :
महाराष्‍ट्र शासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या 62 व्‍या महाराष्‍ट्र राज्‍य नाट्य महोत्‍सवाचा विभागीय पार‍ितोषिक वितरण समारंभ मंगळवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संपन्‍न झाला. नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथे पार पडलेल्‍या बाल नाट्य व राज्‍य नाट्य स्‍पर्धेच्‍या पहिल्‍या फेरीतील विजेत्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला.
 
कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर विभागाचे अध्‍यक्ष अजय पाटील, सदस्‍य प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर, सलीम शेख व ज्‍येष्‍ठ रंगकर्मी रंजन दारव्‍हेकर, देवेंद्र दोडके सांस्‍कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक संदीप शेंडे, प्रज्ञा पाटील यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत दिपप्रज्‍वलनाने झाली. मान्‍यवरांनी विजेत्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या.
 
सांस्‍कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या तीन केंद्रांवर 62 वी महाराष्‍ट्र राज्‍य नाट्य स्‍पर्धा तसेच, 20 वी महाराष्‍ट्र राज्‍य बालनाट्य स्‍पर्धेची प्राथमिक फेरीचे आयेाजन करण्‍यात आले होते. निर्मिती, अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्‍य, दिग्‍दर्शन अशा विविध गटातील विजेत्‍यांना गणेश वडोतकर, अनिल पालकर, श्रीदेवी देवा, संयुक्ता थोरात, नलिनी बनसोड, शंकर शंखपाळे, संगीता टेकाडे, नीलकांत कुल्सुंगे, दिलीप देवरणकर, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, बाबा खिरेकर, बाबा धुळधुळे, अपर्णा लखमापूरे, अतुल भुसारी, किशोर बत्तासे, प्रकाश मुळे, रमेश लखमापुरे, महेश लातूरकर,सतीश काळभांदे,प्रकाश देवा, कमल वाघधरे, संजय रहाटे, विवेक खेर, देवेंद्र बेलणकर, विनोद तुमडे, मृणाल पुराणिक, रंजना पाठक, अनिल चनाखेकर, मीना देशपांडे, समीर पंडित, संजय भाकरे, विष्णू मनोहर, राजेश चिटणीस, देवेंद्र दोडके या नागपुरातील ज्‍येष्‍ठ व श्रेष्‍ठ कलाकारांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार वितरीत करण्‍यात आले. कलावंतांनी ‘भावना एक्‍स्‍प्रेस’ या सांस्‍कृतिक कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून रंगभूमीचा प्रवास उलगडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गिरी व पूजा पिंपळकर यांनी केले.
 

childrens drama and state drama competition winners 
पुरस्‍कार विजेते असे...
 
बालनाट्य स्‍पर्धा
नागपूर केंद्र :
नाट्यनि‍र्मिती – 1. थेंबाचे टपाल, 2. होडी, उत्‍कृष्‍ट अभिनय रौप्‍यपदक - देव नन्‍नावरे, मुग्‍धा कुवारे, रंगभूषा – 1. शुभांगी सरोदे, 2. लालजी श्रीवास, प्रकाशयोजना – 1. विजू वाडेकर, 2. हर्षद ससाणे, नेपथ्‍य – 1. आशिष दुर्गे, 2. अजय देशपांडे, दिग्‍दर्शन – 1. विद्या ससाणे, 2. विरेंद्र, अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र – शांभवी अलोने, कृतिका तरारे, उत्‍साही हाडोळे, म‍िताली साळवे, पूर्वी पौनीकर, आयुष सेजवाल, अन्‍वय झाडे, संवेग नखाते, वेद शेट्टीवार, इशांत धेटे
 
अमरावती केंद्र :
नाट्यनि‍र्मिती – 1. देवाला पत्र, 2. असं कसं 3. खादाड, उत्‍कृष्‍ट अभिनय रौप्‍यपदक – यश वाकळे, धनश्री पांडे, रंगभूषा – 1. स्‍नेहशील गणवीर, 2. सुनिता इहरे, प्रकाशयोजना – 1. सुभाष नांदगावकर, 2. शुभम ठाकरे, नेपथ्‍य – 1. शिध्‍दोदन राऊत, 2. प्रथमेश हाते, दिग्‍दर्शन – 1. ओंकार दामले, 2. वैष्‍णवी राजगुरे, 3. दीपक नांदगावकर, अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र – परी ढोले, स्‍वेहा तराळ, खुशी वहाने, कार्तिकी कुळकर्णी, आराधी ठाकूर, आर्यन श्रीवास्‍तव, स्‍वयंम शिंपी, सार्थक सदाफळे, दक्ष ओरडिया, सोहम ठाकरे
 
हौशी मराठी नाट्य स्‍पर्धा
नागपूर केंद्र :
नाट्यनि‍र्मिती – 1. दृष्‍टी, 2. गावभाग नातं मुळाशी 3. फॉरवर्ड, उत्‍कृष्‍ट अभिनय रौप्‍यपदक – अपर्णा सानप, संजय सातफळे, रंगभूषा – 1. निकिती ढाकुळकर, 2. दिप्‍ती कुंभारे, प्रकाशयोजना – 1. अक्षय खोब्रागडे, 2. अभय करंडे, नेपथ्‍य – 1. शिवम मस्‍के, 2. अनुप मेंढे, दिग्‍दर्शन – 1. पंकज वागळे, 2. मिलिंद, अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र – कल्‍याणी गोखले, ओवी ढवळे, रोह‍िणी ठेंगडी, वैदेही चवरे, म‍िनाक्षी बोरकर, पंकज वागळे, श्‍याम आस्‍करकर, गौरव अंबारे, सार्थक पांडे, मनिष मोहरील
 
चंद्रपूर केंद्र :
नाट्यनि‍र्मिती – 1. जेंडर ॲन आयडेंटीटी, 2. द फिअर फॅक्‍टर 3. अशी पाखरे येती, उत्‍कृष्‍ट अभिनय रौप्‍यपदक – प्रशांत पडपूवार, कल्‍याणी भट्टी, रंगभूषा – 1. शुभदा कक्‍कड, 2. मुक्‍तरंग सोनटक्‍के, प्रकाशयोजना – 1. म‍िथून म‍ि‍त्र, 2. ऋषभ धापोडकर, नेपथ्‍य – 1. तन्‍वी इंगळे, 2. सुशांत भांडारकर, दिग्‍दर्शन – 1. प्रशांत कक्‍कड, 2. प्रमोद काटकर, अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र –कल्‍याणी भट्टी( अपूर्वा खनगन, विशाखा देशपांडे, नूतन धवने, सुमेधा श्रीरामे, प्रशांत मडपूवार, तुषार चहारे, मकरंद परदेशी, शंकर लोडे, प्रजेश घडसे
 
अमरावती केंद्र :
नाट्यनि‍र्मिती – 1. पूर्ण विराम, 2. सती 3. खेळीमेळी, उत्‍कृष्‍ट अभिनय रौप्‍यपदक – हर्षद ससाणे, अनुराधा वाठोडकर, रंगभूषा – 1. लालजी श्रीवास, 2. स्‍नेहश‍िल गणवीर, प्रकाशयोजना – 1. ममता भावसार, 2. वैभव देशमुख, नेपथ्‍य – 1. सुभाष नांदगांवकर, 2. प्रसन्‍न डांगे, दिग्‍दर्शन – 1. हर्षद ससाणे, 2. दीपक नांदगावकर, अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र – वैष्‍णवी राजगुरे, रसिका वडवेकर, सिद्धी देशपांडे, भावना भोपाळे, प्राजक्‍ता सवई, अभिजीत राजस, गणेश वानखेडे, अमोल कुळकर्णी, रोशन समदूरे, धनंजय बोरकर.