अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून काहीही निष्पन्न झाले नाही : डॉ. नितीन राऊत

    24-Jul-2024
Total Views |

Dr Nitin Raut  (Image Source : Internet)
नागपूर :
केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्याही धोरणात्मक निर्णयाचे संकेत देत नाही. सरकारने ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडला आहे, त्यावरून या सरकारचे धोरण अस्पष्ट आहे. मोदी सरकारला घटनात्मक अधिकार धोक्यात आणायचे आहेत. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून काहीही निष्पन्न झाले नाही. भाजप सरकारच्या काळात तरुणांमधील बेरोजगारीत वाढ झाली आहे. सतत वाढत्या बेरोजगारीने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे, अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना उत्तर नागपूरचे आमदार अणि माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.