चिचोलीत शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

    24-Jul-2024
Total Views |
 
Chicholi
 
वाडी :
फेटरी केंद्रातील चिचोली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ६२व्या वर्धापनदिनानिमित्य शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. शाळेच्या पटांगणात विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले. नंतर सर्व मान्यवरांनी समितीच्या ध्येयधोरणेची माहिती सादर केली. फेटरी केंद्राच्या केंद्रप्रमुख पोर्णिमा येरपुलवार यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
 
यावेळी मुख्याध्यापक योगेश राऊत, शिक्षिका विजया वैद्य, पडोळे, अनिल देशभ्रतार राज्यसहसचिव अनिल नासरे, जिल्हा प्रतिनिधी तथा केंद्र प्रमुख प्रकाश सव्वालाखे, नारायण चापले, कल्पना इंगळे, सविता राऊळकर, तालुका नेते विजय जाधव, विजय उमक, दिनकर वानोडे, तालुकाध्यक्ष दामोधर कोपरकर, तालुका सचिव योगेश राऊत, कार्याध्यक्ष प्रदीप काजणे, चिंधु शंभरकर, राजेश साव, अजय रामगिरकर, राजेंद्र इंगोले, सर्व शिक्षक समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.