राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट

    24-Jul-2024
Total Views |
 
Ajit Pawar met Amit Shah in Delhi
(Image Source : Internet/ Representative)
 
नवी दिल्ली :
राज्यात आगामी विधासभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात रात्री 1 वाजता भेट झाली. या भेटीनंतर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सहकारी खासदार सुनील तटकरे, आणि प्रफुल पटेल हे देखील होते. त्यांची अमित शहांसोबत भेट 40-45 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.