Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

    23-Jul-2024
Total Views |
nirmala sitaraman
(Image Source : Internet/ Representative)

नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असून गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
 
 
 
- संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 2024-25 वर्षासाठी संसदेत बजेट वाचन सुरू
 
- रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतुद
 
- देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून देण्यात येईल
 
- आंध्र प्रदेशलाअतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी देणारचेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणारबिहारमध्ये रस्ते बांधणासाठी २६ हजार कोटी तसेच मेडीकल कॉलेज होणार
 
- शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत सर्व प्रमुख पिकांना उच्च न्यूनतम समर्थन मूल्याची घोषणा
 
- उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना प्राधान्य
 
 
 
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ
 
- ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायजेशन करणार
 
- 1 लाख रुपयापेक्षा कमी सॅलरी असणाऱ्यांना EPFO मध्ये पहिल्यांदा रजिस्टर होणाऱ्यांना तीन टप्प्यात 15 हजार रुपये मिळतील
राज्यांना बिनव्याजी 15 हजार कोटी कर्ज देणार
 
- देशभरात 12 नवीन इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार
 
- सूर्य घर योजनेत 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल देणार, 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणार
 
- विष्णुपद मंदिर आणि महाबोधी मंदिराला काशी विश्वनाथच्या धर्तीवर विकसित केले जाईल
 
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची घोषणा
 
- पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार
 
- 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार
 
- काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी विशेष अधिकच्या निधीची तरतूद
 
- हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार
 
- नालंदा विद्यापीठात टुरिरस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न
 
- कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतुदी
 
- खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार
 
- 3O लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना
 
- 500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार
 
- नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार
 
- 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना
 
- मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये
 
- महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना
 
- कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार, या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही
 
- सोने-चांदी स्वस्त होणार. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला
 
- महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार
 
- इलेक्ट्रिक वाहन, मोबाईल, चार्जर, एक्स रे मशिन स्वस्त होणार