'एक पेड माँ के नाम' अंतर्गत साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षारोपण संपन्न

    23-Jul-2024
Total Views |
 
Sai International School
 
रामटेक :
साई इंटरनॅशनल स्कूल येथे इको क्लब फॉर मिशन लाइफच्या बॅनरखाली 'प्लांट फॉर मदर' हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेचा शुभारंभ केला.
 
मोदी यांनी पिंपळाच्या झाडाची रोपटी लावून सुरुवात केली होती. या अंतर्गत 'शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांनी या मोहिमेत स्वेच्छेने सहभाग होऊन, १२४ रोपे लावली. तर 'पेड लगाओ, पेड बचाओ' जन अभियानाचा एक भाग म्हणून, एक पेड माँ के नाम मोहिमेला समर्पित, विद्यार्थ्यांनी घोषवाक्य लेखन, चित्रे आणि पोस्टर बनवण्याच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
 
सदर आयोजनात निसर्ग वाचवा आणि पृथ्वी वाचवा या मोहिमेशी संबंधित लोकांमध्ये जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
 
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्याध्यापक राजेंद्र मिश्रा म्हणाले की, 'आमच्या शाळेतील सर्वोत्तम पद्धती म्हणजे वृक्षारोपण, पर्यावरणपूरक उत्सव आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी लावणे हा वाढदिवस साजरा करणे. कार्यक्रमाच्या भव्य यशासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. एक पेड माँ के नाम मोहिमेच्या भव्य यशाबद्दल शाळेचे संचालक डॉ.विठ्ठलराव नागपूरे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.