केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 28 जुलै रोजी मुंबईत भव्य सत्कार सोहळा

    23-Jul-2024
Total Views |
 
Ramdas Athawale
 (Image Source : Internet)
 
मुंबई |
भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीयराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या रविवार 28 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षा तर्फे आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावने आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड आणि सरचिटणिस विवेक पवार उपस्थित होते.
 
भारत सरकार मध्ये केंद्रीय राज्य मंत्री पदाची हॅट्रिक साधणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे आंबेडकरी चळवळीचे एकमेव नेते ठरले आहेत.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे अनुयायी म्हणून केंद्रीय मंत्री मंडळात समावेश झालेले रामदास आठवले हे पहिले रिपब्लिकन नेते ठरले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळात सलग तीसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री होण्याचा इतिहास रामदास आठवले यांनी घडविला आहे.त्याबद्दल संपुर्ण देशात दलित बहुजनांमध्ये हर्षउल्हास साजरा होत आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असणाऱ्या महाराष्ट्रात रामदास आठवले यांनी केंद्रीयराज्यमंत्री पदाची हॅट्रिक केल्याचा आनंद साजरा होत आहे.त्यासाठी येत्या रविवार 28 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत आयोजीत करण्यात आला आहे.
 
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भव्य सत्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, पप्पू कागदे, ॲड. आशा लांडगे, चंद्रकांता सोनकांबळे, अभया सोनावणे, उषा रामलु, सुरेश बारसिंग, दयाळ बहादुर, श्रीकांत भालेराव, बाळासाहेब गरुड, विवेक पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सत्कार सोहळ्यास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आले आहे.