लाडकी बहीण योजनेनंतर सरकारची महिलांसाठी 'गुलाबी रिक्षा' योजना

    23-Jul-2024
Total Views |

Pink Rickshaw Scheme for Women
(Image Source : Internet/ Representative) 
 
मुंबई :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेननंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे. 17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार असून या योजनेच्या अंतर्गत रिक्षा खरेदीची 20 टक्के रक्कम ही सरकार देणार आहे. महिलांना रोजगार मिळावा या हेतूने सरकारने ही योजना आणली आहे.
 
अजित पवार म्हणाले की, आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. 'गुलाबी रिक्षा' असे या योजनेचे नाव असून या योजनेतून 20 टक्के रक्कम महिलेने भरायचे. तर 20 टक्के सरकार तर 70 टक्के बँक लोन मधून उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रु. 80,000/- प्रदान करण्यात येतील.