अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला खूप काही मिळाले विरोधकांनी राजकारण करू नये- देवेंद्र फडणवीस

    23-Jul-2024
Total Views |
Maharashtra Gained a Lot from the Budget
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करण्याची गरज नाही. फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी मिळाल्या आहे. मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे,अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
देशाचा अर्थसंकल्प देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. अनेक प्रगत देश अर्थव्यवस्थेची झुंजत आहेत. अशा परिस्थितीत भारताने 8.2 टक्याची वाढ दाखवली आहे. ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करुन देणारी वाढ आहे. राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांनाबरोबर घेऊन जुन्या पेन्शनसारखे काही नियम केले. त्याच धर्तीवर आता केंद्र सरकार देखील पुढे नेण्याच काम करत आहे. या अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस न पाडता भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे,असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.