अल्पसंख्यांक समाज बांधवांचे प्रश्न सोडवून पदाची गरीमा वाढवा: राणा दिलीपकुमार सानंदा

    23-Jul-2024
Total Views |
- इशरतउल्ला खान यांचा राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला सत्कार

Ishratullah Khan 
खामगाव:
बुलढाणा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. मो.जावेद सलीम कुरेशी यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या उपाध्यक्षपदी खामगाव विधानसभा मतदार संघातील ग्राम कंझारा येथील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते इशरतउल्ला खान इनायत उल्ला खान यांची नियुक्ती केली आहे. सोमवार 21 जुलै 2024 रोजी जनसंपर्क कार्यालय येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते इशरतउल्ला खान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 
काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते इशरतउल्ला खान यांचा शाल, तिरंगा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पेढा भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने, खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
याप्रसंगी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी क्रियाशील राहुन चांगले काम करा व पदाची गरीमा वाढवा. काँग्रेस संघठण मजबूत करुन अल्पसंख्यांक समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करावे असे सांगुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा इशरत उल्ला खान यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
या कार्यक्रमाला नादीर खान, मुदद्सर खान, फारुक खान, मर्दानअली खान, नौशाद खान, अर्शद खान, ॲड.अजहर खान, कलील खान, राजीक खान, अजमल खान, साकीर खान, रफीक खान, दिलशाद खान, शेख अख्तर, युसुफ खान, अयाज खान, खालीद खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.