विमाशी संघाच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार

    23-Jul-2024
Total Views |
 
Vimashi Sangh
 
वाडी :
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर ग्रामीण कार्यकारिणीची सभा व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर ग्रामीण कार्यकारिणीची सभा रविवार २१ जुलै रोजी आमदार निवास येथे संपन्न झाली. ज्यात रामटेक जिल्हा अधिवेशनचा आढावा घेण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यावर चर्चा झाली. तसेच पुढील काळात नागपूर ग्रामीणचे संघटन अधिक मजबूत करण्याचा उद्देशाने तालुका कार्यकारिणी नव्याने तयार करण्याचा निर्णय झाला व जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला.
 
सभेला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व्हि यू डायगव्हणे, प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष अनिल गोतमारे होते. तसेच जिल्हा कार्यवाह संजय वारकर, कार्याध्यक्ष विजय गोमकर, उपाध्यक्ष शैलेश येडके, दिनेश ढगे, विष्णु राणे, विशाल बंड, धनराज राऊत, सहकार्यवाह सचिन इंगोले, अभिनय ढोबळे, विजय चौधरी, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत व्होरा, प्रसिद्धी प्रमुख दिलीप बांबल, संघटन सचिव संजय वांगे, संघटक भूषण बेलेकर, भूषण कडूकर, रोशन लेंडे, नरखेड तालुका कार्यवाह छत्रपाल राऊत, सावनेर तालुका अध्यक्ष राजेश धुंदाड, पी एस पवार, एन एस माकोडे उपस्थित होते.
 
तसेच जिल्हा कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये उपाध्यक्षपदी धनराज राऊत, सहकार्यवाहपदी विजय चौधरी, प्रसिद्धी प्रमुख दिनकर ठवळे, संघटक दिंगांबर भोगेकर, विलास डाखोळे, महिला प्रतिनिधी विद्या समरित, शिप्रा चवरे, कुसुमा यादव यांची निवड करण्यात आली.