शिक्षक समितीच्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

    23-Jul-2024
Total Views |
- ठिकठिकाणी वृक्षारोपण व विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

Teachers committee 
वाडी :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संघटनेचा स्थापना दिवस प्रत्येक तालुका स्तरावर संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला. २२ जुलै १९६२ रोजी भा.वा. शिंपी गुरुजींनी प्राथमिक शिक्षकांची संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना केली. या घटनेला ६२ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त शिक्षकसमितीचा वर्धापन दिन संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम घेवून साजरा करण्यात येत आहे.
 
शिक्षक समितीच्या नागपूर जिल्हा शाखेकडून या निमित्ताने विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये प्रत्येक तालुक्यात काही शाळांमध्ये वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये नागपूर, काटोल, नरखेड, कामठी, उमरेड, कुही, सावनेर आदी ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले.
 
नुकतेच शिक्षक समितीच्या कामठी तालुका शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हा महिलाप्रमुख पुष्पा पानसरे यांचे उपस्थितीत जि.प.उच्च प्राथमिक शाळा आडका येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष मोरेश्वर तुपे, सरचिटणीस राकेश ढोरे, अनिल श्रीगिरीवार, दशरथ मोरे, विजय शेंडे, प्रकाश रेवतकर, सतीश खरळकर मुख्याध्यापिका रेखा माकोडे, शिक्षक विजय ढवळे, मनिषा सवाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.