‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’: जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त

    23-Jul-2024
Total Views |
 - अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित
 
majhi
(Image Source : Internet/ Representative) 
चंद्रपूर :
जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून 20 जुलैपर्यंत 1 लक्ष 23 हजार 936 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
 
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
 
अशी आहे प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या : जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 58231 तर ऑनलाईन पद्धतीने 65705 असे एकूण 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात जिल्ह्यातील 3 शहरी अंगणवाडी आणि 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये ऑफलाईन 54728, ऑनलाईन 63460 असे एकूण 1 लक्ष 18 हजार 188 अर्ज, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 2652, ऑनलाईन 1097 एकूण 3749 अर्ज, जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 438, ऑनलाईन 678 एकूण 1116 अर्ज तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये ऑफलाईन 413, ऑनलाईन 470 एकूण 883 अर्ज प्राप्त झाले आहेत.
 
जिल्ह्यातील मदत केंद्राची संख्या : जिल्ह्यातील तीन शहरी व 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये एकूण 2962 मदत केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर 825 केंद्र, चंद्रपूर महानगर पालिका स्तरावर 36, नगरपालिका / नगर पंचायत स्तरावर 51 आणि सेतू केंद्रस्तरावर 27 असे एकूण 3901 मदत केंद्र आहे.