ब्रह्मपुरी नगरपरिषद अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे वाजले तीन तेरा

    22-Jul-2024
Total Views |
Brahmapuri Municipal Council
 (Image Source : Internet)
 
ब्रह्मपुरी :
ब्रह्मपुरी नगरपरिषद क्षेत्रा अंतर्गत नुकतेच आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अति उत्साह घाईघाईने या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण केले. परंतु कामाचे कुठलेही योग्य नियोजन व कामाची दर्जा तपासणी न करता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या योजनेचे लोकार्पण केले.
 
ब्रह्मपुरी क्षेत्रातील रुख्मिणी नगर येथील बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे व त्या टाकीला जोडलेल्या वितरण नलिकेचे योग्यरित्या जोडणी न झाल्यामुळे अनेक ठिकाणी १९ जुलै २०२४ ला प्रेशर टेस्टिंग केले असता विविध ठिकाणी लिकेज आढळून आले. त्यातच या कामाची गुणवत्ता दिसून येते. या पंचवार्षिक वर्षात केलेल्या या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असून, गुणवत्ता पूर्ण नसल्याचे निदर्शनात येते. करोडो रुपये खर्च करून जनतेच्या टॅक्समधून केलेल्या या कामाचे तीन तेरा वाजलेले आहेत.
 
तरी नगरपरिषद क्षेत्रातील जनतेची मागणी आहे की, या कामाची सखोल चौकशी करून कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच केलेले नळ वितरण योजनेचे संपूर्णपणे योग्य रीतीने काम पूर्ण करून शहरातील जनतेला पिण्याचे पाणी किंवा मिळेल याची प्रतीक्षा आहे. याव्यतिरिक्त ब्रह्मपुरी नगरपरिषद अंतर्गत काही दिवसापूर्वी केलेल्या डांबरीकरण कामाचे सुद्धा पोलखोल झालेली आहे अनेक ठिकाणी त्या रोडला भगदाड पडलेले आहेत. ब्रम्हपुरी नगरपरिषद अंतर्गत केलेले विकास कामे हे फक्त मलिंदा खाण्याकरिता केले असावेत असे निदर्शनात येत आहे. मागील पंचवार्षिक योजनेत विकास कामाच्या नावाखाली जनतेची फक्त फसवणूक करण्यात आली हे सुद्धा निदर्शनात येत आहे. यामुळे जनतेचा रोष अनेक वार्ड मध्ये पाहायला मिळत आहे.