सतीश डोंगरे यांच्या पुढाकाराने 'लाडकी बहीण' योजनेचे भरले शेकडो अर्ज

    22-Jul-2024
Total Views |
Laadki Behna Yojana
 (Image Source : Internet)
 
रामटेक :
जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे यांच्या कार्यालयामार्फत 'लाडकी बहीण योजने' (Laadki Behna Yojana) चे जवळपास साडेतीनशे अर्ज ऑनलाईन भरण्यात आले. मनसर येथे सांस्कृतिक सभागृहात एका कार्यक्रमात महिलांना नोंदणी पावत्या वाटप करण्यात आल्या. सदर योजनेतंर्गत महिलांना प्रति महीना १५०० रूपये अनुदान मिळणार आहे. भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चा द्वारे योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
 
नोंदणी पावती वाटपप्रसंगी नागपूर भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, भाजयुमो जिल्हा महामंत्री नंदकिशोर चंदनखेडे, सरपंच कैलास नरुले, उपसरपंच योगेश गोस्वामी, ग्राम पंचायत सदस्य देवदत्त तांडेकर,कविता वाढिवे, कल्पना बागडे, सुनंदा पंद्राम, रेखा मडावी व महिला उपस्थित होत्या.