महायुतीला दिलेला पाठींबा मनसेला पडणार भारी;एकमेव आमदाराच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा डोळा!

    22-Jul-2024
Total Views |
Support given to Mahayuti will fall heavily on the MN
 (Image Source : Internet)
 
ठाणे :
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारला बिनशर्त पाठींबा दिला होता. या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड होईल, अशी मनसेची अपेक्षा होती. पण आता महायुतीमुळेच राजू पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने कल्याण ग्रामीण मतदारसंघावर दावा केला आहे.
 
यावर भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्यासह काही जण कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. पण लोकसभा निवडणुकीत राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. जुने मतभेद विसरून त्यांनी श्रीकांत शिंदेचा प्रचार केला. पण आता शिंदे गट आमच्या उमेदवाराच्या जागेवर दावा केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.