लाव्हा सोनबानगर झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्क पट्टे द्या

    22-Jul-2024
Total Views |
- सरपंच ज्योत्सना नितनवरे यांचे आ. समीर मेघे यांना निवेदन
 
Lava Sonbanagar slum dwellers
 
वाडी :
लाव्हा ग्रामपंचायत अंर्तगत असणाऱ्या सोनबानगर झोपडपट्टी शासकीय व खाजगी जागेवर ४० ते ५० वर्षापासून वसलेली आहे. परंतु आतापर्यंत त्यांना मालकी हक्क पट्टे मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिका येथे बैठक घेवून अधिकारी यांना निर्देश दिले होते की, खाजगी व शासकीय जागेवरील मालकी हक्क पट्टे वाटप करण्यात यावे. तोच नियम सोनबानगर येथे सुद्धा लागू पडत असून येथील नागरीकांनासुध्दा मालकी हक्क पट्टे वाटप करण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन आमदार समीर मेघे यांना लाव्हा ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योत्सना नितनवरे यांनी दिले.
 
यावेळी आमदार समीर मेघे यांनी सांगितले की, मी पूर्ण प्रयत्न करतो व मंगळवार २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या सोबत बैठक लावतो. यावेळी माजी जि.प. सदस्य सुजित नितनवरे, मधुकर बर्वे, जीतेश पीडेकर, ग्रा.पं.सदस्य, संतोष शेंडे, ग्रा.पं. सदस्य कपील खडसे, अनील पाटील, राजू धारगावे, प्रकाश डवरे, गोविंदा बांते, तातोबा तळेकर, विजय बर्वे, सुरेश देशमुख उपस्थित होते.