ॲनिमिया ग्रस्त कैद्याचा मृत्यू

    22-Jul-2024
Total Views |
 
prisoner dies
 
अमरावती :
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ॲनिमिया ग्रस्त कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भगवान नथुजी श्रीरामे (55, तिवसाळा, पांढुर्णा खुर्दी, घाटंजी, यवतमाळ) असे मृत कैद्याचे नाव आहे.
 
भगवान श्रीरामे याला पुसद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्यांना ॲनिमियाचा आजार होता. 18 मार्च रोजी भगवान श्रीरामे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे 16 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.