पारडीच्या सुभान नगरमध्ये जमीन खचल्याने स्थानिकांमध्ये भीती!

    22-Jul-2024
Total Views |


Land subsidence in Subhan Nagar of Pardi
 
 
नागपूर :
काही दिवसांपासून नागपुरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच पारडीच्या सुभान नगरमध्ये जमीन खचल्याची घटना समोर आली. त्यामुळे येथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
सुभान नगर परिसरात याअगोदर पडलेल्या पावसामुळे दोन ठिकाणी २० ते २५ फुटाचे खड्डे पडले आहे. तर यंदा जमीन खचून पडलेला हा खड्डा जवळपास २० फुटाचा असल्याची माहिती आहे. सिमेंट रस्त्याचा हा खचलेला भाग असून बाजूलाच लागून घर असल्याने येथील रहिवाशांनी भिती व्यक्त केली.