तलाव फुटीने चिचपल्ली गावात विदारक दृश्य

    22-Jul-2024
Total Views |
- पाण्यात भिजलेल्या धान्यांना फेकले वेशीवर!

Chichappally village 
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली या गावात मागील तीन दिवसापासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामध्ये गावाला लागून असलेल्या मामा तलाव पहाटेला फुटल्याने गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसार माध्यमांनी चिचपल्ली गावाला भेट देऊन पाहणी केली असता, गावात भयानक विदारकदृश्य दिसून आले. गावात घरारात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे अन्यधान्याचे फार मोठे नुसकान झाले. कडधान्यांना अक्षरशः वास सुटला गेला. त्यामुळे नागरिकांनी आपले कडधान्य बाहेर फेकून दिले. पुरात पाळीव प्राणी मरण पावल्यामुळे यामुळे गावात दुर्गंधी होऊन आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
काल प्रशाशनाने दिवसभर पंचनामे केली. परंतु शासनाकडून तात्काळ कुठलीही मदत मिळाली नसल्याचा आरोप गावातील पूरग्रस्तांनी केला. अनेकाचे दोन क्विंटल कुणाचे पाच क्विंटल तांदूळ, गहू, कडधान्य पाण्या भिजल्यामुळे घरात वास सुटले. शासनाची मदत झाली तरी झालेले नुसकान भरून न निघणारे घटना आहे.अनेकांची घरे पडली. भर पावसात उघड्यावर राहाव लागत आहे. अनेक पूरग्रस्तांचे कडधान्य पाण्यात बुडाल्यामुळे त्या कडधान्यांना वास सुटल्या गेली आहे. शासन प्रशासनाकडून पंचनामे करून गेले असले तरी पूरग्रस्तांना कुठलेही प्रकारची मदत मिळाली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लाखो रुपयाचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाकडून तोगडीत मदत देऊन त्यांच्या त्यांच्या तोंडाला पाणी पुसले जातील. पण या पुरघटनेला जबाबदार कोण? मागील अनेक वर्षापासून या मामा तलावाचे दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले नसल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला. वन विभागातील पाण्याचा प्रवाह संपूर्ण तलावात येत असल्याने तलाव तुडुंब भरला जातो. त्याचा परिणाम गावातील जनतेवर होतो, असा आरोप ही नागरिकांनी केला.
अनेक नागरिकाचे पाच क्विंटलपर्यंत धान्याचे नुकसान झाले अनेकाचे कडधान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू उध्वस्त झाल्या प्रशासनाने काल त्याचे पंचनामे करून 174 लोकांची यादी तयार केली. परंतु प्रशासनाने आतापर्यंत नागरिकांना कुठलीही काहि मदत केलेली नाही. अनेक नागरिकांचे कागदपत्रे पाण्याने भिजले. ती मदत भरून काढावी. प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात येईल साठी जिल्हा प्रशासनाने उपायोजनाला राबवाव्या.तसेच शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी चीचपल्ली येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे
गावातील पीडित नागरिक देवदास शेंडे ,सुरेश गेडाम ,सत्कार दुर्योधन, मीना दुर्योधन यांना प्रशासनाद्वारे मिळालेल्या मदतीबाबद विचारपूस केली असता त्यांनी शासनाने आतापर्यंत कुठलीही मदत न केल्याची माहिती दिली.
तसेच या अगोदरही 2008 मध्ये हाच मामा तलाव फुटल्याची त्यांनी खंत माध्यमातून सांगितले. वन विभागाच्या दुर्लक्षित तसेच वारंवार प्रशासनानं या तलावाबद्दल खोलीकरण दुरुस्तीची माहिती देऊ नये सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडल्याची आपभीती नागरिकांनी व्यक्त केली.