नूहमध्ये ब्रजमंडल यात्रा: नूहमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; इंटरनेट बंद

    22-Jul-2024
Total Views |
 
Braj Mandal Jalabhishek Yatra
 (Image Source : X/ Screengrab)
 
नूह :
हरियाणातील नूह येथे गेल्या वर्षी नूहमध्ये ब्रजमंडल यात्रेदरम्यान (Braj Mandal Jalabhishek Yatra) हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेची दखल घेत हरियाणा सरकारने आज नूह येथे निघणाऱ्या ब्रजमंडल यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. येथील नल्हाद मंदिरात सोमवारी ब्रजमंडल यात्रा काढण्यात आली. यावेळी मंदिरातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेला कडेकोट बंदोबस्तात सशर्त मंजुरी मिळाली असून पोलिसांशिवाय निमलष्करी दलही येथे तैनात करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान डीजे आणि शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
 
 
 
जिल्ह्यात इंटरनेट बंदगेल्या वर्षी यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराची दखल घेत प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट बंद केले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार 21 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 22 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास मोबाईल इंटरनेट बंद आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठविण्यावरही बंदी आहे. तसेच डोंगल इंटरनेट चालणार नाही. सुरक्षेसाठी पोलिसांसह निमलष्करी दल आणि कमांडो तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण नूह आणि अरवली टेकड्यांवर नजर ठेवली जात आहे. हरियाणा पोलिस सातत्याने फ्लॅग मार्च काढत आहेत. येथे जमिनीपासून आकाशापर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
 
दरम्यान, नूह येथील नल्हार शिव मंदिरात गेल्या वर्षी जलाभिषेकादरम्यान हिंसक घटना घडली होती. यानंतर पुन्हा एकदा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नल्हार शिवमंदिरात जलाभिषेकाची तयारी सुरू आहे. सोनीपतच्या राधाकृष्ण आश्रमाचे प्रमुख स्वामी दयानंद सरस्वती महाराज यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सरस्वती महाराजांनी मोठी घोषणा केली. 22 जुलै रोजी नल्हार शिव मंदिरात जलाभिषेक करण्यात येणार आहे. तयारी सुरू आहे, यावेळी लहान मुले आणि महिलांना प्रवेशबंदी असेल. तसेच कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी बजरंग दलाची असेल.
 
त्याचबरोबर या वेळी कोणतीही हिंसक घटना घडू नये यासाठी शासन आणि प्रशासनालाही कळविण्यात आले असून, सर्व व्यवस्था साधू संत स्वत: पाहत असून या वेळी सर्व ठिकाणचे संत सोनीपत येथून यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.