सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेविक संघाच्या च्या कार्यक्रमात सहभागी होता येणार; केंद्र सरकारचा निर्णय

    22-Jul-2024
Total Views |
- ५८ वर्षे जुनी बंदी हटवली
 
RSS
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
सरकारी कर्मचारी आरएसएसच्या (RSS) कार्यात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरील ५८ वर्षे जुनी ‘बंदी’ उठवली आहे. ३० नोव्हेंबर १९६६, २५ जुलै १९७० आणि २८ ऑक्टोबर १९८० साली संबंधित कार्यालयांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख निर्बंधातून वगळण्यात यावा असा आदेश सरकारने दिला आहे.
 
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटलं की, फेब्रुवारी १९४८ मध्ये गांधींजींची हत्या झाल्यानंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर निर्बंध लावले होते. त्यानंतर चांगल्या वर्तवणुकीच्या अटीवर हे निर्बंध हटवले गेले. तरीही आरएसएसनं नागपूरच्या मुख्यालयात कधीही तिरंगा फडकवला नाही. १९६६ मध्ये आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यावर निर्बंध लावले होते हा निर्णय योग्यही होता असे त्यांनी म्हंटले आहे.