मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी गुड न्युज!

    22-Jul-2024
Total Views |

CM Eknath Shinde
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (Maratha community students) दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यास मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
 
दरम्यान मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.