मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केला का? प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना संतप्त सवाल

    22-Jul-2024
Total Views |
Pravin Darekars angry question to Manoj Jarange
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक पवित्रा घेतला. ते पुन्हा एकदा उपोषण करण्यास बसले आहे. यादरम्यान जरांगे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या लोकांकडे आम्हाला देण्यासाठी वेळ नाही, हे फक्त मतदान घेतलं की गरिबांना लाथा घालतात. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत, पण यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर फोकस करा. सरकार मराठा समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवलं. मराठा समाजाच्या प्रश्नी सरकार सकारात्मक आहे. आमच्या मुद्द्यांवर इतर देण्याऐवजी शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही, आम्हीही 20 वर्षे राजकारणात आहोत. आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. आम्ही उत्तर देऊ शकतो. त्यांनी हमरीतुमरीची भाषा टाळावी. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केला का? असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.