दाभा येथील अंकाशी सोसायटीत आठ लाखांची घरफोडी

    22-Jul-2024
Total Views |
8 lakh rupees stolen from Ankashi Society in Dabha
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथील सुमिती एन्क्लेव्ह, अंकाशी सोसायटी येथे घरफोडीची घटना घडली. यादरम्यान चोरट्याने आठ लाखांची रोकड चोरून नेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार राजेंद्र प्रसाद सिंग (३२) हे आपल्या कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. 3 जुलै रोजी संधी साधून चोरट्याने घरात घुसून घरातील आठ लाख रुपयांची रोकड लंपास केली. सिंग यांचे परिचित असलेल्या कोणीतरी ही घरफोडी केल्याचा पोलिसांना संशय आहे. गिट्टीखदान पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.