जीर्ण वास्तूमध्ये चालतो लघु पाटबंधारे उपविभागाचा कारभार

    20-Jul-2024
Total Views |
- अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन करतात काम

Minor Irrigation 
चुरणी :
चिखलदरा तालुक्याच्या लघु सिंचन उपविभागाच्या कार्यालय अत्यंत जीर्ण झाले असून कोणत्याही ते कोसळू शकते. अशी परिस्थित असतानाही येथील अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत घेवून काम करित आहेत.
 
या वास्तूची वयोमर्यादा संपली असल्याने या इमारतीच्या स्लॅबची छपाई अक्षरश: खाली पडत आहे. ज्यामूळे स्लॅबच्या सळी दिसत आहेत. या प्रकारामुळे अधिकारी, कर्मचा:यांसह याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणची इमारत दुरुस्त करावी किंवा दुसरी कडे कार्यालय स्थलांतरित करावे जेणेकरून कोणालाही इजा होणार नाही, अशी मागणी कर्मचारी व ठेकेदारांकडून होत आहे. या कार्यालयातून चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद मार्फत होणारे सर्वच प्रकारची जलसंधारणाची कामे केली जातात. मात्र हेच कार्यालय दुर्लक्षित असल्यामुळे या ठिकाणचे काम करणारे कर्मचारी व अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एवढे मात्र निश्चित.