पूर्णा नदी पात्रात बुडाला इसम

    20-Jul-2024
Total Views |
- 10 मिनिटात शोधला मृतदेह
- थुगाव पिपरी येथील घटना

man drowned 
चांदुर बाजार :
तालुक्यातील थुगाव पिपरी येथे पूर्णा नदी पात्रात थुगाव येथील रहिवासी शिवराम सावलकर (वय 55 वर्ष) हे दुपारी एक वाजता बुडल्याची प्राथमिक माहिती तहसील प्रशासनाला मिळाली. त्याआधारे तहसील प्रशासनाकडून जिल्हा बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने अवघ्या दहा मिनिटात बुडालेल्या इसमाचा मृत देह शोधून काढला. थुगाव पिपरी या गावात वाहणारी नदी ही दोन नद्यांचा संगम बनून वाहत असते.
 
तालुक्यातील काजळी देऊरवाडा येथे पूर्णा नदी आणि मेघा नदीचा संगम होऊन ते पुढे थुगाव पिंपरी गावाकडून वाहते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने नद्यांना मोठ्याप्रमाणात पूर आहे. नद्याचे झालेल्या खोलीकरणामुळे पाण्याचा अंदाज अचूक येत नसल्याने कोणीही नदीपात्रात जाऊ नये असे सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी तहसीलदार ऋणय चकुलवार तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल उपस्थित होते.