नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी; जनजीवन विस्कळित

    20-Jul-2024
Total Views |

Heavy rainall in Nagpur
 
 
नागपूर :
Heavy rainall in Nagpur | शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
नागपुरात शनिवारी सकाळी विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाने शहरात कहर केला. या पावसामुळे नागपुरातील अनेक भागात या तलावाचे स्वरूप आले असताना यामुळे अनेक भागात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी तुंबले आहे. यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला.
 
पावसमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. येथील सिताबर्डी परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला असून येथे असणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसगाड्या अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडालेल्या आहेत. मोरभवन आणि एसबीआय क्वार्टर देखील पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नागरिकांना अनेक भागात वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले.