अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

    20-Jul-2024
Total Views |
Health checkup camp
(Image Source : Internet/ Representative)
 वर्धा :
जिल्हा परिषद येथील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी विखे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, आयुष अधिकारी डॉ. संदिप नखाते, आम्रपाली मोरे, साथरोग अधिकारी डॉ. विनित झलके उपस्थित होते.
 
शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे असे आरोग्य तपासणी शिबिर होणे आवश्यक असल्याचे जितीन रहमान यांनी शिबिराच्या उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना म्हणाले. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जिल्हा परिषद येथील 150 पुरुष व 92 महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली व त्यांना औषधोपचार करण्यात आला, असे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.