स्वाभिमानी संघर्ष समितीची स्थापना व पदाधिकाऱ्यांची निवड

    20-Jul-2024
Total Views |
 
Swabhimani Sangharsh Samiti
 
रामटेक :
रामटेक येथील दीप हॉटेल येथे सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'स्वाभिमानी संघर्ष समिती' अशी समिती स्थापन करून एकमताने अन्याय निवारण, भ्रष्टाचार, शासकीय स्तरावरील माहिती स्थानिक लोकांना देऊन त्याचे निवारण करणे तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे अशा विविध विषयांवर चर्चा करून एक मताने स्वाभिमानी संघर्ष समिती असे नाव देण्यात आले.
 
संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून सुरेश वांदिले यांची एकमताने निवड करण्यात आली. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष म्हणून अनिल मुलमुले यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीचे सचिव म्हणून सेवक बेलसरे यांची एक मतांनी निवड करण्यात आली. तसेच रामटेक विधानसभा क्षेत्र सध्या कार्यरत ठेवून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात रामटेक विधानसभा अध्यक्ष मनोज पालीवाल, विधानसभा उपाध्यक्ष शुभम दोंदलकर, विधानसभा सचिव अनीवेश देशमुख, रामटेक तालुका अध्यक्ष अमीत बादुले, रामटेक तालुका उपाध्यक्ष विनायक महाजन,रामटेक तालुका उपाध्यक्ष जयपाल बडवाईक, रामटेक तालुका सचिव प्रफुल्ल पुसदेकर, रामटेक तालुका सहसचिव नितेश देशभ्रतार, रामटेक शहर अध्यक्ष बजरंग काटोले, रामटेक शहर सचिव हरिचंद नागपुरे व देवलापार तालुका अध्यक्ष नरेंद्र डहरवाल या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
 
भविष्यात'स्वाभिमानी संघर्ष समिती' जनसामान्यांच्या विवीध समस्यांसाठी निवेदने व आंदोलने हातात घेऊ असे प्रतिपादन स्वाभिमानी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश वांदिले यांनी केले.