लाव्हा ते दवलामेटी रस्त्यात खड्डा दुरुस्त करण्याची मागणी

    20-Jul-2024
Total Views |
Demand to repair pothole
 
वाडी :
लाव्हा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लाव्हा ते दवलामेटी या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले असून लाव्हा गावालगत असलेल्या छोट्या नाल्याजवळ पुलाचे बांधकाम करून तो रस्ता पूर्ण न केल्यामुळे या भागत मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी खड्डयात साचल्याने मोठे डबके तयार झाले आहे.
 
या मार्गाने मोठ्या शाळेत घेऊन जाणाऱ्या बसेसची वर्दळ असते, सध्या स्थितीत रस्त्यात पडलेला खड्डा पूर्णपणे पाण्याने भरला असल्याने वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहने चालविणे अत्यंत जोखमीचे काम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खाली उतरून खड्ड्याच्या बाजूने रस्ता पार करावा लागतो, तर अनेक वेळा दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन झाल्यावर पुलाचे बांधकाम करून समस्या निकाली काढण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संतोष शेंडे यांनी केली आहे.