माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 लाख अर्जाचा टप्पा पार

    20-Jul-2024
Total Views |
 
CM Majhi Ladki Bahin Yojana
(Image Source : Internet/ Representative) 
 
बुलडाणा :
राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Majhi Ladki Bahin Yojana) ऑनलाईन आणि ऑफलाईन कर्ज करण्यात सुरवात झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 10 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहे. यात 70 हजार ऑफलाईन, तर 40 हजार अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले आहे.
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपर्यंत 1 लाख 10 हजार 779 महिलांनी अर्ज दाखल केले आहे. यात 70 हजार 10 महिलांनी ऑफलाईन, तर 40 हजार 769 महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यात 4 लाख 97 हजार 651 संभाव्य पात्र महिला आहेत.
 
बुलडाणा तालुक्यात 11 हजार 264 अर्जामध्ये ऑफलाईन 9 हजार 299, ऑनलाइन 1 हजार 965, चिखली तालुक्यात 10 हजार 513 अर्जामध्ये ऑफलाईन 7 हजार 708, ऑनलाइन 2 हजार 805, देऊळगाव राजा तालुक्यात 11 हजार 130 अर्जामध्ये ऑफलाईन 8 हजार 426, ऑनलाइन 2 हजार 704, सिंदखेड राजा तालुक्यात 6 हजार 39 अर्जामध्ये ऑफलाईन 3 हजार 396, ऑनलाइन 2 हजार 643, लोणार तालुक्यात 9 हजार 658 अर्जामध्ये ऑफलाईन 4 हजार 862, ऑनलाइन 4 हजार 796, मेहकर तालुक्यात 17 हजार 170 अर्जामध्ये ऑफलाईन 10 हजार 756, ऑनलाइन 6 हजार 414, मोताळा तालुक्यात 6 हजार 684 अर्जामध्ये ऑफलाईन 2 हजार 723, ऑनलाइन 3 हजार 961, मलकापूर तालुक्यात 6 हजार 403 अर्जामध्ये ऑफलाईन 4 हजार 703, ऑनलाइन 1 हजार 700, नांदुरा तालुक्यात 6 हजार 231 अर्जामध्ये ऑफलाईन 3 हजार 909, ऑनलाइन 2 हजार 322, शेगाव तालुक्यात 3 हजार 889 अर्जामध्ये ऑफलाईन 2 हजार 95, ऑनलाइन 1 हजार 764, खामगाव तालुक्यात 7 हजार 932 अर्जामध्ये ऑफलाईन 5 हजार 246, ऑनलाइन 2 हजार 686, जळगाव जामोद तालुक्यात 5 हजार 950 अर्जामध्ये ऑफलाईन 2 हजार 721, ऑनलाइन 3 हजार 229, संग्रामपूर तालुक्यात 7 हजार 916 अर्जामध्ये ऑफलाईन 4 हजार 166, ऑनलाइन 3 हजार 750 अर्ज दाखल झाले आहेत.
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदार महिला स्वत: मोबाईल ॲपवरून अर्ज सादर करू शकतील. तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करू शकतील. तसेच सेतू, सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रमध्येही विनामुल्य अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. महिलांनी या सेवांचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत.
 
महिलांच्या थेट बँक खात्यात 1 हजार 500 रूपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अर्जामध्ये बँकेचा तपशिल अचूक भरावा. तसेच अर्ज करण्याची सुविधा विनामुल्य असल्याने सुविधा केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम महिलांकडून घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.