अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का; 'या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

    20-Jul-2024
Total Views |
Big shock to Ajit Pawar again
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात अनेक नेत्यांनी महायुतीची साथ सोडत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यातच आता अजितदादांच्या गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज (20 जुलै) सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
 
दरम्यान स्वतः अतुल बेनके यांनी देखील या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येऊ शकतात, असं आमदार अतुल बेनके म्हणाले आहेत. एक प्रकारे त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत संकेतच दिले आहेत.