टोमॅटोच्या भावात पुन्हा वाढ; एक किलोसाठी द्यावे लागणार 'इतके' पैसे

    19-Jul-2024
Total Views |
Tomato Prices Rise Again
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
टोमॅटोचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहे.उत्पादन आणि पुरवठा घटल्यामुळे टोमॅटोच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.प्रतिकिलो टोमॅटोची किंमत ८० ते १०० रुपये झाली आहे.
 
बदलत्या हवामानाचा पीकांवर गंभीर परिणाम झाला असून टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली. पावसाळा सुरु झाल्याने काढणी आणि पुरवठा मंदावला आहे. मुंबई, दिल्ली तसेच कोलकाता यांसारख्या शहरात टोमॅटो 100 रुपये किलोच्या भावाने विकले जात आहेत. राज्यातही बऱ्याच भागात टोमॅटोचे दर वाढले.