सुरेश गायकवाड प्रेरणादायी व्‍यक्तिमत्‍व: सिद्धार्थ गायकवाड

    19-Jul-2024
Total Views |
- 10 वी, 12 वी गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार

Inspirational Personality 
नागपूर :
शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य कायम कसे ठेवायचे, विद्यार्थ्‍याचे गुणवर्धन आणि त्‍यांच्‍यावर कसे संस्कार करायचे याचे आदर्श उदाहरण म्‍हणजे सुरेश गायकवाड हे असून त्‍यांच्‍याकडून इतरांना प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.
हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेतर्फे शाळेतील 10 वी व 12 वीच्या गुणवंतांचा सत्कार समारंभ नागपूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन हॉल, इंदोरा चौक येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, मुख्य अतिथी समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, विशेष उपस्थिती उपशिक्षणाधिकारी विजय काकडे, उपशिक्षणाधिकारी सुशील बन्सोड, संस्थाध्यक्ष वीणा गायकवाड, सदस्य उल्हास गायकवाड, महालक्ष्मी पगारदार कर्मचारी पतसंस्थेचे सचिव वासुदेव राऊत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सिद्धार्थ गायकवाड म्‍हणाले, सुरेश गायकवाड हे आर्थिक लाभापेक्षा मानसिक समाधानासाठी कार्यरत असून त्‍यांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्‍लेखनीय व प्रेरणादायी आहे. माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सुरेश गायकवाड यांना शुभेच्‍छा देताना सुरेश गायकवाड यांची ह‍िराबाई गायकवाड शिक्षण संस्‍था इतरांसाठी आदर्श असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. तर मिलिंद माने यांनी युवकांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिल्यास ते दुसर्‍यांना रोजगार देणारे बनतील व आपल्या शाळेचे, शिक्षकांचे, संस्थेचे नाव उज्‍जवल करतील अशा सूचना मार्गदर्शनातून दिल्या.
उल्हास गायकवाड यांनीदेखील वड‍िलांच्‍या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. सुरेश गायकवाड संस्थेला वटवृक्षाचे स्वरूप प्राप्‍त करून दिले. असे विजय कोकोटे म्‍हणाले. वीणा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव मोठ्या प्रमाणात व्हावा, याकरिता सरांच्या वाढदिवसानिमित्त या गुणवंतांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आल्‍याचे सांग‍ितले. कार्यक्रमाचे संयोजक संस्था सहसचिव तेजस गायकवाड, कार्यवाह सुधीर वारकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वैष्णव, केंद्रे, देऊळवार, पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.