स्व. डॉ. विजय गुळकरी यांच्या स्मvरणार्थ रंगली संगीत संध्या

    19-Jul-2024
Total Views |
 
Music evening
 
नागपूर :
दिवंगत डॉ. विजय गुळकरी यांच्या स्मरणार्थ स्वरमंथन द्वारे ‘दिल कि कलम से’ या सुरेल संगीत संध्येचे कविवर्य सुरेश भट सभागृहात नुकतेच आयोजन करण्‍यात आले. मंथन उकुंडे यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी डॉ. विजय गुळकरी यांना श्रद्धांजली वाहताना त्‍यांनी 'चिठ्ठी ना कोई संदेस' आणि 'फुलो के रंग से' हे शीर्षकगीत सादर केले.
 
कार्यक्रमाचे आयोजन स्वरमंथनच्या सचिव वीणा उकुंडे यांचे तर संकल्पना रागिणी निखाडे यांची होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शिनी जे.एल. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. दिनेश चापले यांची उपस्‍थ‍िती होती. कीर्ती विजय गुळकरी यांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. वीणा उकुंडे, रागिणी निखाडे यांच्यासह कल्पना गणवीर, डॉ. प्रज्ञा भेलवा, पूनम मिर्झा, प्रवीण आदमने, विश्वास तग्रपवार, हेमंत नासेरी, मनोज गणवीर, प्रशांत तुमसरे, डॉ. सुशील गादेकर, रवींद्र मनोहरे, रवी सहारे, आराधना सचिन गलगले, विकास पाटील, प्रशांत तुमसरे आदींनी विविध गीते सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन एम.ए. रज्जाक यांनी केली. आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रुपेश दुधे, बाल रंगभूमी संस्थेचे संचालक विलास कुबडे, बांधकाम व्यावसायिक संतोष कटियार, कविता वानखेडे यांचे कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले.