मायक्रोसॉफ्टची क्लाऊड सेवा विस्कळीत; या क्षेत्राला बसला फटका

    19-Jul-2024
Total Views |
Microsoft Cloud Services Disrupted
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
मायक्रोसॉफ्टची क्लाउड सेवा शुक्रवारी दुपारी अचानक विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील विमानसेवा आणि बँकसेवा ठप्प झाल्या आहेत. क्लाऊड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील एअरलाइन्सशी संबंधित सर्व्हरमध्ये मोठ्या त्रुटी होत असल्याची माहिती पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे विमान चालवण्यात अडचण निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांची विमाने उडू शकत नाहीत. याचा परिणाम भारत आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर झाला आहे.
  
 
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून, आतापर्यंत 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या सिंगापूरच्या चांगी विमानतळावर मॅन्युअली चेक-इन प्रक्रिया सुरू केली जात आहे. सध्या 74 टक्के वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट स्टोअर मध्ये लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. तर 26 टक्के वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट ॲपमध्ये समस्या येत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या या त्रुटीमुळे ब्रिटनमधील सुप्रसिद्ध स्काय न्यूजही बंद झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. तर, तांत्रिक बिघाडांमुळे या त्रुटीमुळे लंडन, मुंबई स्टॉक एक्सचेंजवर परिणाम झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, CrowdStrike ने त्रुटीची कबुली दिली आहे आणि बगची चौकशी करत आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्हाला या त्रुटीची माहिती मिळाली आहे. हे बहुतेक विंडोज सिस्टममध्ये दृश्यमान आहे. अनेक वापरकर्ते याबद्दल तक्रार करत आहेत. या त्रुटीमुळे लाखो वापरकर्ते प्रभावित झाले आहेत. बरेच वापरकर्ते तक्रार करत आहेत की त्यांची सिस्टम एकतर बंद होते किंवा त्यांना निळा स्क्रीन दिसत आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवर त्याचा परिणाम होत आहे.

नागपूर विमातळावर 'या' चार फ्लाईट झाल्या रद्द
मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरासह भारतातील विमानतळावर विमान सेवेवर त्याचा परिणाम झाला. नागपूर विमानतळालाही त्याचा फटका बसला असून चार फ्लाईट रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत ७०० प्रवाशांची तारांबळ उडाली. मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे नागपूर - बेंगलुरु (6E-6803)फ्लाईट, नागपूर -दिल्ली (6E-2035) फ्लाईट, नागपूर- दिल्ली (6E-6573), नागपूर -मुंबई (6E-806) या फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.