धापेवाडा क्षेत्रात 22 जुलैला दारुबंदी

    19-Jul-2024
Total Views |

Liquor ban on July 22 in Dhapewara area
(Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
विदर्भाचे पंढरपूर अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील मौजा धापेवाडा (बु) येथे आषाढी एकादशी व आषाढी (गुरु) पोर्णिमानिमित्त श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान (ट्रस्ट) येथे 22 जुलैपर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत होणाऱ्या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टिकोणातून तेथील सर्व देशी व विदेशी दारू विकीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे.
 
मौजा धापेवाडा (बु) येथे आषाढी पोर्णिमेनिमित्त भरणा-या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातुन धापेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील तसेच धापेवाडा ग्रामपंचायत सीमेपासून 2 कि.मी. परिसरातील सर्व नमुना-ई, नमुना-ई 2, एफएलडब्ल्यू-2, सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, सीएलएफएलटीओडी-3, एफएल-3, एफएलबीआर-2, व टीडी-1 ह्या अनुज्ञप्त्या 22 जुलै रोजी बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरूध्द सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे.