जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात तरुणांकरीता व्यसनमुक्ती कार्यक्रम

    19-Jul-2024
Total Views |
 
Jawaharlal Nehru
 (Image Source : Internet)
वाडी :
वाडी येथील जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि एन.के.पी. साळवे मेडिकल कॉलेज व लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयीन तरुणांकरीता व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय टेकाडे होते. प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य वक्ते मानसिक रोग विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुशील गावंडे, प्रा. डॉ. आनंद खरे, मुख्याध्यापक सचिन डेहनकर, जितेंद्र मुळे, विशाल फुरसुंगे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संजय टेकाडे यांनी केले.
 
प्रा.डॉ. सुशील गावंडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे होणाऱ्या विविध रोगांबद्दल माहिती दिली. तरुणांना व्यसनमुक्तीचे विविध उपाय समजून सांगितले. उपस्थितांनी व्यसनामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर होणाऱ्या वाईट परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. संचालन प्रा. अमित गायधने यांनी केले.
 
कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. काशिनाथ मानमोडे, महाविद्यालयातील नेचर ग्रीन क्लब समन्वयक प्रा.डॉ. अविनाश इंगोले यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. कॉर्डिनेटर प्रा. डॉ. नरेंद्र घारड, प्रा. डॉ. नितीन कोंगरे, प्रा. डॉ. अर्चना देशमुख, प्रा. डॉ. लीना फाटे, प्रा. डॉ. मनीषा भातकुलकर, प्रा. पंकज पाटील, प्रा. शुभम सहारे व वरिष्ठ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद सर्व विद्यार्थी उपस्थित होते.