काँग्रेस पक्ष महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही: नाना पटोलेंचे विधान

    19-Jul-2024
Total Views |

Nana Patole
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
काँग्रेस पक्ष संविधान लोकशाही व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची लढाई करणार आहे. आम्ही महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची संपत्ती आणि मुंबई गुजरातला विकू देणार नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
 
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के.सी.वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले.
 
२० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या महाभ्रष्ट युती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हाच काँग्रेसचा संकल्प असल्याचे पटोले म्हणाले.