मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जिल्ह्यात गावपातळीवर महिला सभांचे आयोजन

    19-Jul-2024
Total Views |

CM Majhi Ladki Bahin Yojana
 
अकोला :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (CM Majhi Ladki Bahin Yojana) प्रसिद्धी जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली असून योजनेच्या व्यापक अंमलबजावणीसाठी गावोगाव महिला सभा घेण्यात येत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे यांनी आज येथे दिली.
 
योजनेच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून, गावोगाव योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे.
 
कोलखेडे म्हणाल्या की, ग्रामस्तरीय समित्यामार्फत महिला सभा घेऊन अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन होत आहे.
 
महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, लाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.