दवलामेटीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे व सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

    18-Jul-2024
Total Views |
 
VBA
 
वाडी :
नागपूर अमरावती महामार्गावरील दवलामेटी येथे वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुका, दवलामेटी जिल्हा प. सर्कल, दवलामेटी शाखा कार्यालयाचे व सार्वजनिक वाचनालयचे उद्घाटन रविवारी माजी जि.प. सदस्य दिनेश बन्सोड, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर, जिल्हा माहा सचिव महिला आघाडी माधुरीताई खोब्रागडे, दवलामेटी ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच रिताताई उमरेडकर, जिल्हा सचिव महानंदाताई राऊत, सामाजिक कार्यकर्ता सुमितभाऊ मेश्राम यांच्या हस्ते विधिवत फीत कापून उत्साहात करण्यात आले.
 
राजकीय दृष्ट्या हे कार्यालय वंचितच्या चळवळीचे केंद्र व्हावे व परिसरातील वंचित व अन्यायग्रस्तांना या कार्यालयाच्या माध्यमातून सहकार्य होणार असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश बन्सोड यांनी व्यक्त केले. तसेच पक्ष कार्यालया सोबत सार्वजनिक वाचनालयाचे पण संयुक्तपणे उद्घाटन यावेळी करण्यात आले. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व महापुरुशांचा विचारची माहिति देणारे पुस्तके, जनरल नॉलेज, चालू घडामोडी, देशातील तसेच जागतिक इतिहासा ची माहिती असलेले पुस्तके, राजकीय, सामाजिक माहिती असणारे पुस्तके वाचणासाठी, उपलब्ध राहणार आहेत. यावेळी मनीष बोरकर, माधुरी खोब्रागडे, रीताताई उमरेडकर, महानंदा राऊत यांनीही समायोजित मार्गदर्शन केले.
 
कार्यक्रमाला दवलामेटीतील सहा ही वॉर्डातले कार्यकर्ता उपस्थित होते. तक्षशिला विहार कमेटी, जागृती बौद्ध विहार कमेटी, जयभिम चौक कमेटीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नागपूर ग्रा तालुका उपाध्यक्ष नागेश बोरकर यांचा नेतृत्वात जिल्हा प सर्कल अध्यक्ष राजेश वानखेडे, तालुका सदस्य वामन वाहने, प्रकाश मेश्राम, आयटी सेल प्रमुख रोहित राऊत, दवलामेटी शाखेचे पदाधिकारी श्रीकांत रामटेके, प्रवीण अंबादे, स्वप्नील चारभे, दर्शन बेले, शुभम भालाधरे, चंद्रदीप गजभिये, विवेक तामगडे, सुमेद फुलझेले, दिपक कोरे, विकास रामटेके, मधुकर गजभिये, रईस डोंगरे, संजय खोब्रागडे, विकास भारशंकर, संदीप लांमसोंगे, समीर मेश्राम, नरेश गवई आणि महिला कार्यकर्त्यां प्रीती वाकडे, जोत्सना बेले, विद्या गणवीर, सोनिया वानखेडे, सुषमा भालाधरे, यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी भाऊसाहेब वासनिक, शेखर गणवीर, राहुल लांमसोंगे, गाणार काका, शरद ढोके, मोनू बागडे, ईश्वर उके, नरेंद्र नितनवरे, सुखदेव सोमकुवर व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.